नुतन अध्यक्ष वृंदा गवंडळकर यांनी समाजपयोगी उपक्रम घेण्याचे केले जाहिर
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ला इनरव्हील क्लबच्या नूतन पदाधिकार्यांचा पदाधिकार ग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून इनरव्हील क्लबच्या माजी डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सायली प्रभू यांनी नुतन पदाधिकाऱ्यांना पदाची शपथ दिली. मावळत्या अध्यक्षा स्मिता दामले यांनी सर्वांचे स्वागत केले. सचिव श्रीया परब यांनी गेल्या वर्षांचा अहवाल सादर केला. त्यानंतर नूतन अध्यक्षा सौ. वृंदा गवंडळकर यांनी चालू वर्षात राबविण्यात येणाऱ्या नवीन उपक्रमांची माहिती दिली. यंदा आंतरराष्ट्रीय इनरव्हील क्लबचे १०० व्या वर्षात पदार्पण होत असून, आपण सहकाऱ्यांच्या मदतीने यंदा अनेक सेवाभावी व समाजपयोगी उपक्रम आयोजित करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन असे स्पष्ट केले.
वेंगुर्ला इनरव्हील क्लबच्या २०२३-२४ च्या समितीमधील कार्यकारीणी अध्यक्षा वृंदा गवंडळकर, उपाध्यक्ष अफशान कौरी, सचिव श्रीया परब, खजिनदार ज्योती देसाई, आय.एस.ओ. डॉ. पुजा कर्मे, एडीटर आकांक्षा परब, कार्यकारीणी सदस्या स्मिता दामले, पुनम बोवलेकर, रेखा नाईक, रशिका मठकर, सई चव्हाण, गौरी मराठे यांचा समावेश आहे. तसेच यावेळी कुडाळ इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा संजना काणेकर सावंतवाडी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रिया रेडीज यांचा समावेश होता. तसेच इनरव्हील क्लबचे मार्गदर्शक रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष तथा बँ. खर्डेकर काँलेजचे प्राचार्य आनंद बांदेकर हे यावेळी उपस्थित होते.
या पदग्रहण सोहळ्याचे औचित्य साधून अध्यक्षा वृंदा गवंडळकर यांनी इनरव्हील क्लबच्या माध्यमातून गरजू, होतकरू व हुशार असलेल्या शालेय विद्यर्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम नगरपरीषदेतील प्रशासकिय अधिकारी संगिता कुबल या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला.









