प्रतिनिधी /बेळगाव
नागशांती हय़ुंडाईने आपल्या ग्राहकांसाठी मोबाईल व्हॅन रुजू केली असून त्याचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले.
नागशांतीच्या बेळगावसह चिकोडी, गोकाक, सौंदत्ती व अथणी येथे शाखा आहेत. पण त्या वगळून अन्य ठिकाणच्या ग्राहकांना वाहनांच्या दुरुस्तीसाठी शाखेपर्यंत पोहोचणे कठीण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन नागशांती हय़ुंडाईने मोबाईल व्हॅनद्वारे ग्राहकांपर्यंत ही सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल व्हॅनद्वारे ग्राहक आपल्या वाहनांची दुरुस्ती करून घेऊ शकतात. ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









