उचगाव /वार्ताहर
शिक्षण आणि सहकाराच्या माध्यमातून हजारो जणांना रोजगार देण्यासाठी रात्रंदिवस कार्यरत असलेले सच्चे समाजसेवक आणि समाजकार्याच्या क्षेत्रात विविध प्रकल्प उभारणारे शिल्पकार म्हणून किरण ठाकुर हे सर्वपरिचित आहेत. समाजकार्याचा वसा मर्यादित न ठेवता आपला मराठी माणूस दिल्लीच्या तख्तापर्यंत मजल मारतो ही आम्हा बेळगावकरांना आणि तमाम मराठी माणसांना अभिमानाची गोष्ट असल्याचे भावोद्गार अॅड. अनिलराव पावशे यांनी व्यक्त केले.
उचगाव येथील लोकमान्य सोसायटीच्या उचगाव शाखेमध्ये, सोसायटीच्या 29 व्या स्थापना दिवसनिमित्त ‘मोदक निवेश’ योजनेच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख वत्ते म्हणून पावशे बोलत होते. या कार्यक्रमाला बसुर्ते गावचे बसवंत बेनके, नीलकंठ कुरबुर, हभप वैजनाथ गोजगेकर, हभप नारायण पुन्नाजिचे, वामन कदम, अशोक कलजी, भरमा चोपडे, यादव गुऊजी, तरळे, जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. स्वागत शाखा मॅनेजर भूषण वालावलकर यांनी केले. लोकमान्य सोसायटीच्या 29 व्या स्थापना दिनानिमित्त उपस्थित ग्राहक, सभासद आणि ठेवीदारांना ‘मोदक निवेश’ योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली.
प्रारंभी गणेश फोटोचे पूजन निळकंठ कुरबुर यांच्या हस्ते तर दीपप्रज्वलन एन. ओ. चौगुले, अॅड. अनिल पावशे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उचगावसह परिसरातील ग्राहक, सभासद, ठेवीदार, हितचिंतकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती.
सूत्रसंचालन सागर कांबळे यांनी केले. तर पराशी उर्फ बबन फर्नांडिस यांनी आभार मानले.









