सरस्वती गल्ली, शिवगर्जना युवक मंडळातर्फे आयोजन
वार्ताहर/किणये
सरस्वती गल्ली, किणये येथील शिवगर्जना युवक मंडळ यांच्या वतीने एका माणसाने बैलगाडी ओढण्याची शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीचे मोठ्या थाटात उद्घाटन नुकतेच करण्यात आले. अध्यक्षस्थानी अशोक डुकरे हे होते. डॉ. भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते बैलगाडी पूजन करून शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले. शिवगर्जना युवक मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती डुकरे हे स्वागताध्यक्ष म्हणून होते. त्यांनी प्रास्ताविक करून उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. ग्रामपंचायत सदस्य माऊती डुकरे, आंतरराष्ट्रीय मल्ल महेश डुकरे, आकाश डुकरे, शंकर पाटील ,ग्रामपंचायत सदस्य श्रीधर गुरव, सातेरी कोकितकर, तुकाराम डुकरे, विष्णू पाटील आदींच्या हस्ते विविध देवदेवतांच्या फोटो प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य वर्षा डुकरे तसेच रेणुका डुकरे, अनिता पाटील ,सुवर्णा पाटील ,लक्ष्मी डुकरे ,योगिता दळवी आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रमुख वत्ते म्हणून समरसेन पाटील व रामलिंग गुरव हे उपस्थित होते. त्यांनी बैलगाडी ओढण्यासाठी आलेल्या सर्व पैलवान व खेळाडूंना तसेच युवकांना मार्गदर्शन केले. बैलगाडी मध्ये 50 किलो वाळूचे पोते ठेवण्यात आले होते. तालुक्याच्या विविध गावातील पैलवान व खेळाडूंनी शर्यतीत सहभाग घेतला होता. सूत्रसंचालन पुंडलिक दळवी यांनी केले.









