Inauguration of Malgaon Village Secretariat on 19th February
मळगाव ग्रामसचिवालयाच्या नूतन इमारतीचे उद्धाटन शिवजयंत्तीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी रोजी हेणार आहे . या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे उपस्थित राहणार आहेत .त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली जिल्हा बॅक अध्यक्ष मनीष दळवी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे माजी पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ माजी सभापती राजू परब पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांची उपस्थिती राहणार आहेत .तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन मळगाव सरपंच सौ. स्नेहल जामदार उपसरपंच हनुमंत पेडणेकर ग्रामविकास अधिकारी संदिप गोसावी तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे .
न्हावेली / वार्ताहर









