बेंगळूरजवळील हेब्बाळ येथे नवीन दालन सुरू : आकर्षक सवलतीही जाहीर
बेळगाव : मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने बेंगळूरजवळील हेब्बाळ येथे नवीन दालन सुरू केले आहे. मलाबारचे ग्रुप चेअरमन एम. पी. अहमद यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी संचालक ओ. अशर, शामलाल अहमद, फिल्सोर बाबू, अब्दुल्ला इब्राहिम व अन्य उपस्थित होते. अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी यांच्या हस्ते फीत कापून दालनाचा शुभारंभ करण्यात आला. या ठिकाणी भारतीय परंपरेला अनुसरून विविध दागिने, आधुनिक दागिने, डायमंड्सचे दागिने तसेच नववधूंसाठीचे खास दागिने उपलब्ध आहेत. उद्घाटनाच्या निमित्ताने मलाबार गोल्डने काही आकर्षक सवलतीही जाहीर केल्या आहेत. 30 हजार रु. खरेदीवर 100 मिलीग्रॅमचे नाणे भेट मिळणार आहे. डायमंड खरेदीवर 30 टक्के सवलत व डायमंड दागिन्यांच्या घडणावळीवर 30 टक्के सूट देण्यात येणार आहे. 25 हजार रु. खरेदीवर एसबीआय कार्डधारकांना 5 टक्के सवलत आहे. हेब्बाळ येथे सुरू झालेल्या फोनिक्स मॉलमध्ये जागतिक दर्जाची ज्वेलरी उपलब्ध आहे. कर्नाटकातील ग्राहकांची विश्वासार्हता मलाबार असून मलाबारच्या सर्व शोरुममध्ये एकच दर असल्याचे एम. पी. अहमद यांनी सांगितले.









