वृत्तसंस्था/ भोपाळ
देशामध्ये विविध राज्यात खेलो इंडियाची केंद्रे उभारण्यात आली आहेत. शनिवारी मध्याप्रदेशमधील भोपाळच्या टाटानगर स्टेडियममध्ये 49 व्या खेलो इंडियाच्या केंद्राचे उद्घाटन केंद्रीय क्रीडा युवजन खात्याचे मंत्री अनुराग ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले.
या केंद्राच्या उद्घाटन समारंभाला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान तसेच राज्य क्रीडामंत्री यशोधरा राजे सिंधिया त्याचप्रमाणे मध्यप्रदेश क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण देशामध्ये 1000 खेलो इंडिया केंद्रांची स्थापना केली जाईल अशी घोषणा अनुराग ठाकुर यांनी केली.









