बेळगाव – नव्याने बांधण्यात आलेल्या बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाचे येत्या मंगळवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते अधिकृत उद्घाटन होणार आहे. मध्यवर्ती बस स्थानकाच्या नूतनीकरणाची योजना 2009 पासून आखली आहे. जानेवारी 2017 मध्ये कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. बस स्थानक कार्यरत करण्यासाठी मूलभूत पायाभूत सुविधा आणि इमारत तयार आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार बस स्थानकाचे नूतनीकरण जानेवारी 2019 पर्यंत पूर्ण व्हायला हवे होते मात्र दुर्दैवाने ते रखडले आहे. मध्यवर्ती बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी 32,48,54,759.59 एवढे रुपये खर्च करण्यात आला असून सदर बस स्थानकाचे काम हर्षा कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांना देण्यात आले होते. हे बस स्थानक 3.8 एकर जागेत विस्तारले असून त्याला लागून एन डब्ल्यू के आर टी सी डिव्हिजनल वर्कशॉप 4.68 एकर जागेत स्थापित आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









