विविध वस्तूंचे प्रदर्शन : स्तुत्य उपक्रमांना कॉलेजकडून नेहमीच प्रोत्साहन
प्रतिनिधी /बेळगाव
एसकेई संस्थेच्या राणी पार्वती देवी कॉलेजच्या ‘हॉबी सेंटर’ (छंद प्रोत्साहन विभाग) च्या 2022-23 या वषीच्या उपक्रमांच्या उद्घाटनाचा प्रारंभ व दीपावलीनिमित्त विद्यार्थ्यांनी बनवलेल्या अनेक सुबक व सुंदर वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्या डॉ. अनुजा नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्याच हस्ते सरस्वती देवी प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
‘हॉबी सेंटर’ विभागाच्या अध्यक्षा प्रा. इंदिरा होळकर यांनी स्वागत, प्रास्ताविक करून हॉबी सेंटरच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी प्राचार्या डॉ. अनुजा नाईक यांनी उपक्रमांचे कौतुक करून अशा स्तुत्य उपक्रमांना कॉलेजकडून नेहमीच प्रोत्साहन देण्यात येते, असे मनोगत व्यक्त करून उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी ‘हॉबी सेंटर’ विभागाच्या सदस्या प्रा. भारती अध्यापक, डॉ. सुनंदा कितली, प्रा. लता कणबरकर, प्रा. सोनल कलबुर्गी, प्रा. विजया जोशी, प्रा. मयुरी, डॉ. राजेंद्र पोवार, प्रा. विजयकुमार पाटील, डॉ. सुभाष पाटील, डॉ. हरीश कोलकार, डॉ. ऐनर रामकृष्ण, प्रा. प्रसन्ना जोशी, डॉ. एम. एस. कुरणी, प्रा. परसू गावडे व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.









