बेळगाव / प्रतिनिधी
द.म.शि. मंडळ संचालित ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयात नुकताच जिमखाना आणि झंकार उद्घाटन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील होते. व्यासपीठावर जिमखाना चेअरमन प्रा. एस. एस. पाटील, प्राचार्य आर. डी. शेलार, डॉ. बी. एस. नावी, सहसचिव डॉ. दीपक देसाई होते.
कर्नाटक राज्य अक्कमहादेवी महिला विश्वविद्यालय विजयपूर येथील डॉ. नावी यांच्या हस्ते झंकार भित्तीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी इच्छाशक्ती, ज्ञान, बुद्धी, कौशल्य हे आपला विकास करतात. त्यांची कास धरून जीवनात पुढे गेले पाहिजे, असे मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक प्रा. एस. एस पाटील यांनी केले. प्राचार्य शेलार यांनी स्वागत केले. प्रा. डी. ए. निंबाळकर यांनी परिचय करून दिला. याप्रसंगी डॉ. दीपक देसाई, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन विजयाश्री चव्हाण यांनी केले. आभार ओंकार पन्हाळकर यांनी मानले.









