प्रतिनिधी/ बेळगाव
जीएसएस पीयू कॉलेजच्या विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून भरत पाटील उपस्थित होते. त्यांनी आजच्या स्पर्धात्मक जगात प्रत्येकाने चिकाटीने व कर्तृत्वाने ध्येय गाठले पाहिजे, असे सांगितले.
प्रारंभी प्राचार्य एस. एल. देसाई यांनी स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. कीर्ती फडके यांनी करून दिला. सृष्टी बागेवाडी हिने स्वागतगीत सादर केले. सर्व विद्यार्थ्यांना त्यांची कर्तव्ये समजावून देण्यात आली. याप्रसंगी एसकेईचे पदाधिकारी लता कित्तूर, ज्ञानेश कलघटगी, क्रीडा शिक्षक विनय नाईक, उपप्राचार्य सचिन पवार, प्रा. अनिल खांडेकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन प्रा. वैशाली भारती व प्रा. वेदश्री देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. साक्षी कुलकर्णी व प्रा. शुभांगी मुरकुटे यांनी केले. उपप्राचार्य सचिन पवार यांनी आभार मानले.









