म्हैसूर येथील उद्घाटनाचे थेट प्रक्षेपण : महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती
वार्ताहर /नंदगड
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारची महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेला बुधवारी मैसूर येथे थाटात प्रारंभ झाला. त्याचे थेट प्रक्षेपण खानापूर नगरपंचायत व तालुका प्रशासनाच्यावतीने खानापूर शहरातील रेल्वेस्टेशन जवळील नगरपंचायतीच्या कल्याण मंडपात स्क्रीनवर दाखवण्यात आले. तर त्याचठिकाणी खानापूर येथील योजनेचा शुभारंभ आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते झाडाच्या रोपाला पाणी घालून करण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड, नगरसेवक लक्ष्मण मादार, नगरसेविका मेघा कुंदरगी आदींनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या या गृहलक्ष्मी योजनेची माहिती दिली. त्या योजनेचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
आमदार विठ्ठल हलगेकर यावेळी म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी व जनतेसाठी विविध लोकोपयोगी योजना सुरू केल्या आहेत. अनेक लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. राज्यातील काँग्रेस सरकारने विविध गॅरंटी योजना सुरू केल्या आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होणार आहे. जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून या योजना चांगल्या आहेत. या योजना केवळ मर्यादित काळापुरता न ठेवता कायमस्वरूपी कराव्यात, असे आवाहन केले. या तालुक्मयाचा आमदार या नात्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांचेही अभिनंदन केले. तहसीलदार प्रकाश गायकवाड म्हणाले, खानापूर तालुक्मयात 67,551 कुटुंबप्रमुख महिला आहेत. त्यामध्ये 56,403 कुटुंब प्रमुख महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. त्यांना सरकारने घोषित केल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याला 2000 ऊपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे तालुक्मयातील 83 टक्के महिलांना त्याचा लाभ होणार आहे. यावेळी नगरपंचायतीचे नगरसेवक, विविध खात्यांचे अधिकारी व महिला उपस्थित होत्या.









