वार्ताहर /जुने गोवें
नुतनीकरण व सौंदर्यीकरण केलेल्या केरें चोडण येथील गणपती विसर्जन शेड चे प्रमुख पाहुणे मयें मतदार संघाचे आमदार श्री प्रेमेंदृ शेट यांच्या हस्ते उद्धाटनकरण्यात आले. यावेळी उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष श्री कार्तिक कुडणेकर, मयें जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, प्रभागाचे पंचायत सदस्य सरपंच कमलाकांत वाडयेकर, पंचायत सदस्य सावियो कुलासो,आरती बांदोडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
सुरवातीला या प्रकल्पाचे शिल्पकार चोडणचे सरपंच कमलाकांत वाडयेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर , जिल्हा पंचायत अध्यक्ष कार्तिक कुडणेकर व आमदार श्री प्रेमेंदृ शेट यांनी या प्रकल्पासाठी जिल्हा पंचायतीकडू निधी उपलब्ध करून दिल्यानेच आपल्या प्रभागात हा सुंदर प्रकल्प साकार झाल्याचे सांगुन त्यांचे आभार मानले.
गणपती विसर्जन शेडचा हा प्रकल्प खरोखरच डोळय़ांचे पारणे फेडणारा झाला असून, त्या साठी मी या प्रभागाचे पंचायत सदस्य व सरपंच कमलाकांत वाडयेकर यांचे अभिनंदन करतो. जिल्हा पंचायत निधीतून चांगले चांगले प्रकल्प मयें मतदार संघात व्हावे यासाठी आपला नेहमीच पाठिंबा असेल असे आमदार श्री प्रेमेंदृ शेट यांनी सांगितले. येत्या पाच वर्षांत मयें मतदार संघाचा शक्मय होईल तेवढा विकास करण्यासाठी माझी धडपड असेल असे तें म्हणाले.उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष कार्तिक कुडणेकर व मयें जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर यांचीही समयोचित भाषणे झाली.रामेश्वर वाडयेंकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व शेवटी उपस्थितांचे आभार मानले.









