पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची उपस्थिती
बेळगाव :
माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात उभारण्यात आलेल्या चार नव्या पोलीस चौक्यांचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी उद्घाटन करण्यात आले. शिवबसवनगर, महांतेशनगर, रुक्मिणीनगर, रामतीर्थनगर गणेश सर्कल परिसरात चार नव्या पोलीस चौक्यांची उभारणी करण्यात आली आहे. हायवे पेट्रोलिंग, शक्ती, बीट पेट्रोलिंग, शट्टर पेट्रोलिंगवरील अधिकारी व पोलिसांना अनुकूल व्हावे, गुन्हेगारी घटविण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी अनुकूल व्हावे, यासाठी या चौक्या उभारण्यात आल्या आहेत.
15 ऑगस्ट रोजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते पोलीस चौक्यांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ, पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, निरंजन राजे अरस आदी अधिकारी उपस्थित होते.









