न्हावेली / वार्ताहर
Inauguration of district level rope competition in Tulsa by Vishal Parab
सिद्धार्थ कलाविष्कार युवा मंडळ, तुळस यांच्यावतीने सिद्धार्थनगर येथे बुद्धपौर्णिमा व भीम जयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सव २०२३ मधील जिल्हास्तरीय रस्सीखेच उद्धाटन विशाल सेवा फाऊंडेशन चे संस्थापक तथा भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले .
विशाल सेवा फाऊंडेशन पुरस्कृत आणि सिंधुदुर्ग रस्सीखेच संघ यांच्या मान्यतेने ही स्पर्धा होत असून या स्पर्धेच्या उद्धाटन कार्यक्रमाला तुळस सरपंच रश्मी परब , उपसरपंच सचिन नाईक, तसेच माजी सरपंच शंकर घारे , विजय रेडकर, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, सौ . चरित्रा परब , सौ . रतन कबरे, तंटामुक्ती अध्यक्ष मंदार तुळसकर, आदी मान्यवर उपस्थित होते .









