ओटवणे प्रतिनिधी
कै श्री बाबुराव पाटयेकर शिक्षण प्रसारक मंडळ झरेबांबरचे संस्थापक अध्यक्ष कै. झिला पाटयेकर यांची 88 वी जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीचे औचित्य साधून नाईक पाटयेकर कुटुंबीयांकडून त्यांच्या स्मरणार्थ शाळा डिजिटल करण्यासाठी आवश्यक ती साधनसामग्री प्रदान करण्यात आली त्यानिमित्य संस्थेचे खजिनदार शरद नाईक संचालक शशिकांत नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. पहिल्या तीन यशस्वी विद्यार्थ्यांना झिला पाटयेकर यांच्या स्मरणार्थ नाईक पाटयेकर कुटुंबीयांकडून रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात आले संस्थेचे संचालक शशिकांत नाईक यांनी शाळेच्या उत्कृष्ट कार्याची प्रशंशा करून शाळेसाठी आवश्यक या भौतिक सुविधा व जून 2023 मध्ये संपूर्ण शाळा अद्ययावत साधन सामुग्रीसह डिजिटल करण्याचे आश्वासित केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात एम. एम एस .परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांची ,शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची व क्रीडाशिक्षक आर.जी.पाटील यांचे अभिनंदन केले .तसेच शाळेतील सर्व क्रीडा स्पर्धेसाठी आवश्यक साहित्य पुरवण्याचे आश्वासन दिले. सदर कार्यक्रमाला सुधाकर सुकी, भास्कर परब सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक जयवंत पाटील यांनी केले सूत्रसंचालन देसाई सर तर आभार तिळवे सर यांनी मानले.