प्रतिनिधी /बेळगाव
येळ्ळूर रोडवरील केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या पुढाकाराने डायलेसिस सेंटर उभारण्यात आले आहे. गुरुवारी संध्याकाळी केएलई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करून सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी पी.डी.जी. रोटे. संग्राम पाटील, डॉ. एस. सी. धारवाड, डॉ. एच. बी. राजशेखर तसेच रोटे. शरद पै, रोटरी क्लब बेळगावचे अध्यक्ष बसवराज विभुती, सचिव अक्षय कुलकर्णी व माजी अध्यक्ष डॉ. केळुसकर उपस्थित होते.
या डायलेसिस सेंटरसाठी पुढाकार घेतल्याबद्दल पराग भंडारी, अनिष मैत्राणी, बसवराज विभुती, संजय कुलकर्णी, डॉ. भांडणकर व निरंजन संत यांचा डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सेंटरची जबाबदारी नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. विजयकुमार पाटील यांच्याकडे असून त्यांचा आणि त्यांच्या सहकाऱयांचाही सत्कार करण्यात आला.
डॉ. प्रभाकर कोरे यांनी क्लबच्या या प्रकल्पाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून रोटरीच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन डॉ. मुकुंद उडचणकर यांनी केले. अक्षय कुलकर्णी यांनी आभार मानले.









