ओटवणे / प्रतिनिधी
Inauguration of Dasavatari Drama Festival in Karivade!
नाट्यमहोत्सवाची शनिवारी सांगता
कारिवडे येथील श्री देव हेळेकर मंडळ आयोजित दशावतार नाट्यमहोत्सवास मंगळवारी रात्री थाटात प्रारंभ झाला. पाच दिवस चालणाऱ्या या दशावतार नाट्यमहोत्सवाची सांगता शनिवारी ६ मे रोजी होणार आहे. या दशावतार नाट्य महोत्सवासाठी पाच दशावतारी कंपन्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.या दशावतार नाट्य महोत्सवाचे उद्दघाटन कारिवडे सोसायटीचे माजी चेअरमन विठ्ठल परब यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून कारिवडे गावचे उपसरपंच नितिन गावडे यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आले. यावेळी कारिवडे सोसायटीचे चेअरमन महादेव माळकर, पोलिस पाटील प्रदीप केळुसकर, महादेव माळकर, अनंत झिडगे, दशरथ माळकर, परशुराम पालव, विजय माळकर, तानाजी माळकर, रामचंद्र शिंदे, सोमा राऊळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मंडळाचे अध्यक्ष गोविंद परब यांनी केले.
या दशावतार नाट्य महोत्सवात गुरुवारी ४ मे आजगावकर दशावतार नाट्य मंडळ (आजगाव) शिर मारीले आईचे, शुक्रवारी ५ मे जय संतोषी माता दशावतार नाट्य मंडळ (मातोंड) शापित घुबड, शनिवारी ६ मे बोर्डेकर दशावतार नाट्य मंडळ (दोडामार्ग) देव भक्तीला भुकेला ही नाटके सादर केली जाणार आहेत.
कारिवडे पेडवेवाडी शाळा नं २ च्या रंगमंचावर होणाऱ्या या नाट्यमहोत्सवास दररोज सायंकाळी ७ वाजता प्रारंभ होणार आहे. नाट्यरसिकांनी या दशावतारी नाट्य महोत्सवाचा याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव हेळेकर मंडळाने केले आहे.









