शाळेच्या स्काऊट गाईड पथकाचा उपक्रम
ओटवणे प्रतिनिधी
माडखोल धवडकी येथील आयएसओ मानांकित शाळेच्या स्काऊट गाईड पथकामार्फत विद्यार्थ्यांनी शिवलेल्या पर्यावरण पुरक कापडी पिशवी विक्री केंद्राचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. सर्वांना आदर्शवत ठरणार हा उपक्रम वर्षभर चालू राहाणार आहे
यावेळी प्लॉस्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक कापडी पिशव्या वापरण्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच शाळेचे स्काऊट मास्तर अरविंद सरनोबत यांनी सर्व विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांनी पिशव्या खरेदी करून पर्यावरण समृद्धीला हात दिला.
या अभिनव उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा पोलीस पाटील उदय राऊत, उपाध्यक्षा समिक्षा पानोळकर, माजी अध्यक्ष तुळशीदास मुरकर, ग्रामपंचायत सदस्य दत्ताराम कोळमेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश शिरसाट, लक्ष्मण कोळमेकर, लखन आडेलकर, माजी उपसरपंच अँड सुरेश आडेलकर, मुख्यापिका श्रीम. भावना गावडे, सर्व शिक्षक, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.









