सावंतवाडी प्रतिनिधी
साटम महाराज वाचनालय, दाणोली या वाचनालयाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधुन बालकुमार ज्ञान कोपरा या दालनाचे उदघाटन कु. सानिया व अध्यक्ष भरत गावडे, यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष भास्कर परब, मुख्यापक डॉ. विठ्ठल सावंत, सचिव डॉ. एल. डी. सावंत व शालेय मुले उपस्थिती होती. या वेळी अध्यक्ष भरत गावडे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील प्रसंग सांगितले. शाहू महाराज मोठ्या दिलासा राजा म्हणून ओळखले जाते. सर्व समाजातील मुलांसाठी वसतिगृह उभारुन शैक्षणिक कार्याला हातभार लावला होता. शाहू महाराज चे शैक्षणिक व सामाजिक कार्य फार मोठे आहे.









