न्हावेली / वार्ताहर
मळगाव येथील प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयाच्या बालवाचक कक्षात ‘बालकुमार वाचक कोपरा’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वाचन मंदिरच्या सदस्या सेवानिवृत्त प्राचार्य शुभांगी धर्म, नम्रता गवंड़े यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीत व बाल वाचकांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. यानिमित्त वाचन मंदिराच्या बाल साहित्य विषयक पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले. कार्यक्रमास वाचनालयाच्या संचालक स्नेहा खानोलकर, कर्मचारी, संचालन व वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष हेमंत खानोलकर यांनी, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गुरुनाथ नार्वेकर यांनी मानले.









