सातार्डा –
15 व्या वित्त आयोगातून मिळाला निधी
कवठणी ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने 15 व्या वित्त आयोग निधीतून पाराचीवाडी येथील अंगणवाडीच्या शौचालयाचे ( बेबी टॉयलेट) काम पुर्ण करण्यात आले. या शौचालय इमारतीचे उद्धघाटन सरपंच अजित कवठणकर यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमित कवठणकर, रश्मी कवठणकर, विजया कवठणकर, सी आर पी. रेखा रेडकर व योगिता जाधव, सामाजिक कार्यकर्ते कॉजमा डिसोजा,मुख्याध्यापक विद्याधर लाड, ग्रामसेवक विश्वनाथ लातये व शाळेतील मुले उपस्थित होती.









