Inauguration of Anganwadi building at Malewad-Kumbharwadi
मळेवाड कुंभारवाडी येथील अंगणवाडी इमारतीचा शुभारंभ तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.डोंगरी विकास योजनेअंतर्गत मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतने मळेवाड कुंभारवाडी येथील अंगणवाडीची इमारत नव्याने बांधण्याकरिता 12 लाख 30 हजार रुपयांचा निधी डोंगरी विकास योजने अंतर्गत उपसरपंच हेमंत मराठे यांनी प्रयत्न करुन उपलब्ध केला आहे.या इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ मळेवाड कोंडुरे तंटामुक्ती अध्यक्ष तथा भाजप बुध अध्यक्ष अमित नाईक यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात
आला.
यावेळी सरपंच मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे,ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक,तात्या मुळीक,मधुकर जाधव, कविता शेगडे,नाना कुंभार,सद्गुरु कुंभार शिरी कुंभार,नकुल कुंभार,बाळा कुंभार,अविनाश कुंभार,ठेकेदार शुभम वैद्य तसेच कुंभारवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्हावेली / वार्ताहर









