वार्ताहर /पालये
ऑल गोवा आर्ट मास्टर असोसिएशन आणि कला व संस्कृती संचालनालय पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तक्ष’ या गणेश विषयावर आधारित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन गोवा कॉलेज ऑफ आर्ट्सचे प्रिन्सिपल विली गोयश यांच्या हस्ते कला व संस्कृती संचालनालयाच्या कलादालनात झाले. यावेळी प्रेमानंद च्यारी (बासरी वादन) व मयूर नाईक (तबला) यांनी रंगत आणली. चित्रकला शिक्षकांच्या 46 कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन 11 सप्टेंबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले राहणार आहे.









