मंदिर जिर्णोद्धारासाठी 6 कोटी खर्च : मंत्री सुभाष फळदेसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी/पणजी
नार्वे- डिचोली येथील सप्तकोटेश्वर या प्रसिद्ध ऐतिहासिक मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून त्याचा लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वा. होणार आहे. मंदिर जिर्णोद्धारासाठी 6 कोटी खर्च करण्यात आले असून मंदिराची जुनी रचना- शिल्पकला आणि इतर रेखीव काम कायम ठेवण्यात आले आहे. पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पर्वरी येथील मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. ते म्हणाले की, या निमित्ताने 9 ते 11 फेब्रुवारी असे तीन दिवस विविध कार्यक्रम उपक्रम तसेच धार्मिक विधी आयोजित करण्यात आले असून उद्घाटनास सातारा महाराष्ट्र येथील आमदार शिवेंद्र राजे भोसले, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक इतर मंत्री, आमदार तसेच इतिहास संशोधक उपस्थित रहाणार आहेत. पांडुरंग बलकवडे याचे व्याख्यानही आयोजित करण्यात आले असून जनतेने त्या सोहळ्dयात सामील व्हावे असे आवाहन फळदेसाई यांनी केले आहे.
राज्यातील इतर अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यासाठी खात्याकडे अनेक अर्ज आले असून त्यावर विचार चालू आहे. खांडेपार येथील मशिदीचे काम करण्यासाठी विनंती आली असून चर्चचेही पुनर्बाधंकाम क्हावे असल्यास आणि तसा अर्ज आल्यास त्यावर विचार करण्यात येणार असल्याचे फळदेसाई यांनी नमूद केले. गोवा मुक्तीपुर्वी गोव्यातील अनेक मंदिरे नामशेष झाली होती. त्यांचे पुनर्बांधकाम करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. ढोल, ताशे, पथक, पोवाडे, भक्तीगीत असे विविध आकर्षक कार्यक्रम या सोहळ्dयात होणार आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांची हजेरी लाभणार असून मंदिराचे स्वऊप कायम ठेवूनच जिर्णोद्धार करण्यात आल्याची माहिती फळदेसाई यांनी दिली.









