वेंगुर्ले (वार्ताहर)-
जगभरातील विविध संकटावेळी रोटरी नेहमीच सामाजिक जाणिवेतून आपली भूमिका व जबाबदारी पार पाडीत असते. जगातील पोलीओ निर्मूलनासाठी भरीव योगदान हा त्यातीलच एक उपक्रम आहे. रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनने वेंगुर्लेत समाजपयोगी विविध उपक्रम राबवून समाजांत रोटरीचे कार्य उल्लेखनीय आहे हे जनतेस दाखवून दिलेले आहे. त्याप्रमाणे समाजपयोगी महत्वाचे उपक्रम रोटरी क्लबच्या नवीन पदाधिकारी व कार्यकारीणीने राबवावेत. असे प्रतिपादन शपथ प्रदानाधिकारी रोटरी क्लबचे भावी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर नासिर बोरसादवाला यांनी रोटरी क्लबच्या पदग्रहण कार्यक्रमांत केले.येथील साईमंगल कार्यालयातील डिलक्स हॉलमध्ये रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे नुतन अध्यक्ष सुनील रेडकर, उपाध्यक्ष राजू वजराटकर, सचिव पंकज शिरसाट तर खजिनदार नितीन कुलकर्णी यांचा पदग्रहण कार्यक्रम रोटरी क्लबचे भावी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर नासिर बोरसादवाला यांचे हस्ते व प्रमुख पाहुणे असिस्टंट गव्हर्नर दिपक बेलवलकर, सौ. निता गोवेकर, गव्हर्नर एरीया एड प्रणय तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर उपस्थित प्रमुख मान्यवरांत मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, फर्स्ट लेडी सकिना बोरसादवाला, मावळते अध्यक्ष सदाशिव भेंडवडे, सचिव सुरेंद्र चव्हाण, इंटरनॅशनल सर्व्हीस- राजेश घाटवळ, माजी नगराध्यक्ष तथा रोटरीचे पब्लीक ईमेज चेअरमन दिलीप गिरप, बोर्ड ऑफ डायरेक्टर (क्लब सर्व्हीस)- संजय पुनाळेकर यांचा समावेश होता.
यावेळी उपस्थितांत रोटरीचे युथ सर्व्हीस- योगेश नाईक, रोटरी फाऊंडेशन- गणेश अंधारी, मेंबरशीप-सचिन वालावलकर, सर्व्हीस प्रोजेक्ट- पिटर रॉड्रीक्स, लिट्रसी-आनंद बांदेकर, स्पोर्टस-अनमोल गिरप, टीच अँण्ड वीन- आशिष शिरोडकर, अजित धारगळकर, पोलिओ- वसंतराव पाटोळे, व्होकेशनल सर्व्हीस-राजन गावडे, सार्जंट ऑफ आर्म- आशुतोष शिरोडकर व दिलीप शिताळे, दादा साळगांवकर, विनय सामंत यांचा समावेश होता.रोटरी इंटरनॅशनल च्या या वर्षीच्या प्रेसिडेंट जेनिफर जोन्स यांनी दिलेल्या ईमँजीन रोटरी या यंदाच्या थीम प्रमाणे व डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्यंकटेश उर्फ बबन देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रोटरी वर्षात समाजाभिमुख विविध कार्यक्रम `दिल से’ या थिमप्रमाणे घेण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुनिल रेडकर यांनी या कार्यक्रमांत स्पष्ट केले.









