Rautwadi Waterfall Kolhapur News : राधानगरी भुदरगडचे आमदार प्रकाश आबीटकर यांच्या विशेष प्रयत्नातून वन्यजीव विभागाच्या निसर्ग पर्यटन योजनेतून राऊतवाडी धबधबा येथे विविध पर्यटन विकास कामाचे लोकार्पण कार्यक्रम सोमवार दि,26 जून ला सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे.
राऊतवाडी धबधबा हा मान्सून पर्यटनाचे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे व गर्दी होणारे पर्यटन स्थळ आहे. पण येथे पर्यटकाना सोयी सुविधांचा अभाव होता पण निसर्ग पर्यटन योजनेतून आकर्षक स्वागत कमान, पोलीस व फॉरेस्ट गार्ड साठी चौकी,पुरुष व स्त्रियांना स्वतंत्र चेंजीग रुम,बाथरूम ची सोय करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आर एम रामानुजन मुख्य वन संरक्षक व श्री जी गुरुप्रसाद उप वन संरक्षक तसेच गोकुळ संचालक अभिजित तायशेटे,वन्यजीव अधिकारी सुहास पाटील,अजित माळी,पडळी गावाचे सरपंच सुरेश पाटील व पडळी वन्यजीव समिती,ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.









