Inauguration ceremony of Nishan Lake and Suspension Bridge was completed online by Chief Minister Eknath Shinde.
वेंगुर्ले नगरपरिषदेला 144 वर्षाची समृद्ध परंपरा लाभलेली असून नगरपरिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरावा अशा “वेंगुर्ला शहर नळ पाणी पुरवठा योजना टप्पा क्र. २ निशाण तलावाची उंची 2.50 मीटरने वाढविणे” व वेंगुर्ले-नवाबाग बीच जोडणाऱ्या जलबांदेश्वर मंदिराजवळ केबल स्टेड पदपथ पुल या कामांचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते गुरुवारी आँनलाईन संपन्न झाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांत राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई व कोल्हापूरचे पालकमंत्री दिपकभाई केसरकर, राज्याचे उदय सामंत, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, माजी आमदार राजन तेली, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची महिला जिल्हा संघटक अनारोजीन लोबो, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, वेंगुर्ले तहसीलदार प्रवीण लोकरे, वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा समावेश होता.वेंगुर्ले बंदर येथील आँनलाईन लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाले.
यावेळी वेंगुर्ले तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर व तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांनी या भागातील हापूस आंब्याच्या हार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना घातला.
तदनंतर आँनलाईन पध्दतीने रिमोट व्दारे झुलता पुल व निशान तलाव दुसरा टप्पा या कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाचे वेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख सुनिल डुबळे, बाळा दळवी, शहर प्रमुख उमेश येरम वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, शितल आंगचेकर, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, यासह स्थानिक मच्छीमार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
वेंगुर्ले / प्रतिनिधी









