Inauguration ceremony of new building of Chhaya Police Wireless Re-launch Center completed
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते लोकार्पण
पोलिस बिनतारी पुन: प्रक्षेपण केंद्र चौके साळेल येथील नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा नुकताच पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे शुभहस्ते चौके साळेल या ठिकाणी नुकताच संपन्न झाला.यावेळी अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग नितीन बगाटे,प्रभारी जिल्हा विषेश शाखा पोलिस निरीक्षक संध्या गावडे,स्थानिक गुन्हे अन्वक्षेक पोलिस निरिक्षक संदिप भोसले,पोलिस निरिक्षक विजय यादव,पोलिस अधिक्षक वि.प.कोकण परिक्षेत्र एस.के.चक्रनारायण,पोलीस निरिक्षक वि.सं.सिधुदुर्ग व सर्व बिनतारी संदेश अधिकारी समीर साळुंखे उपस्थित होते
जिल्हा नियोजन समितीच्या सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०१९—२०२० या योजने अंतर्गत या नूतन इमारतीची उभारणी करण्यात आलेली आहे.अतिशय देखणी व सर्व सोयीयुक्त अशी हि इमारत बांधण्यात आलेली आहे.जिल्हातील सर्वात उचं भागामध्ये हि बिनतारी पुन:प्रक्षेपण इमारत बांधण्यात आलेली असून जिल्हातील कोणत्याही पोलिस स्टेशन वरती या ठिकाणावरून संपर्क साधता येणार आहे.या ठिकाणचा परिसर पाहून पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी पोलिस बँड प्रथकानी या ठिकाणी आलेल्या पाहुण्याचे स्वागत करण्यात आले.यावेळी बिनंतारी संदेश विभागचती अधिकारी,अमलदार व अन्य कर्मचारी वर्ग उपस्थित होता.यावेळी समीर साळुंखे यांनी मान्यवराचे स्वागत केले.
चौके/वार्ताहर









