वेंगुर्ले (वार्ताहर)-
श्री वेंगुर्ले शहरातील सर्वात जुन्या अशा मारूपी स्टॉप मंदिरात हनुमान मंदिरात हनुमान मंदिर सेवा न्यास व हनुमान भक्त मंडळातर्फे साकारलेल्या मंदिरातील समोरच्या भागातील श्री स्वामी समर्थांच्या दिव्यांच्या स्वरूपातील प्रतिकृतीचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते उदघाटन झाले.
यावेळी उपस्थित मान्यवरांत दिलीप गिरप, नितीन मांजरेकर, उमेश येरम, सुनिल डुबळे, सुहास कोळसुलकर यांसह श्री. हनुमान मंदिर सेवा न्यासचे पदाधिकारी अजय खानोलकर, महेश मयेकर, गौरव खानोलकर, शैलेश केसरकर, गौतम गाडेकर, हरेष पाडगांवकर, सोहम सामंत, सिध्दार्थ सामंत आदींसह हनुमान भक्त मंडळाचे सदस्य तसेच शिवसेना व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









