बेळगाव: बेळगाव उत्तर मतदार संघात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते, फ्रूट मार्केटजवळील आझाद नगर येथे नवीन वीज केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. यापूर्वी ३५ किलोवॅट क्षमतेचे वीज केंद्र असलेले आता ११० किलो वॅटवर अपग्रेड केले जाणार आहे.

कणबर्गी पर्यंत भूमिगत विद्युत वायरिंग घालण्याच्या नवीन प्रकल्पाचा हा पाया होता. या समारंभात बोलताना माननीय आमदार असिफ सेठ म्हणाले, कि “वीज पुरवठा आणि वीजेतील चढ–उतार या समस्या शहरातील लोकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. हे असे प्रकल्प आहेत जे मी नेहमी अशा गोष्टींना सुधारून याचे निवारण करण्याकरिता सदैव प्रयत्न केला आहे.

हा प्रकल्प शहरातील विद्यमान आणि आगामी काळात येणारे प्रकल्प, शहरातील व्यवसायांना आणि रहिवाशांना लाभदायी ठरणार आहेत, हा प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रजासत्ताक दिनापेक्षा दुसरा चांगला दिवस होऊच शकत नाही. असे मनोगत व्यक्त केले.









