ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक ग्राहकांना वीज दरात सवलत देण्यासाठी उपसमिती नेमण्यात आली आहे. या संदर्भातील एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकावर समितीचे अध्यक्ष ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तर समितीच्या इतर सदस्यांमध्ये सुधीर मुनगंटीवार (वने), उदय सामंत (उद्योग), अतुल सावे (सहकार) या मंत्र्यांची नावे आहेत. तर वित्त खात्यासमोर कोणत्याही आमदाराचं नाव लिहिलेलं नाही. त्यामुळे हे खातं सरकारमध्ये नव्याने सामील झालेल्या अजित पवार गटाकडे जाणार की काय? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

विदर्भ, मराठावाडा, उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक ग्राहकांना वीजदरात सवलत देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ सुधारित उपसमिती स्थापन करण्यासाठीचा हा जीआर आहे.








