वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गुगलने अलीकडेच त्याच्या निष्क्रिय खाते धोरणात एक महत्त्वपूर्ण अद्यतन जाहीर केले आहे. किमान 2 वर्षांपासून निष्क्रिय (इनअॅक्टिव्ह) असलेली खाती 1 डिसेंबर 2023 पासून हटवण्याची योजना ‘जीमेल’ने आखली आहे. गुगलने संबंधित खातेधारकांना मेल पाठवून अलर्ट जारी केला आहे. सद्यस्थितीत मोठ्या संख्येने लोक ‘जीमेल’ वापरतात. पूर्वी याहू आणि रेडिफ हे लोकप्रिय ईमेल प्लॅटफॉर्म असताना आता जीमेल खाते सर्वात लोकप्रिय आहे. मात्र, आता कंपनी निष्क्रिय खात्यांशी संबंधित सामग्री काढून टाकणार असल्याने जीमेलधारकांना सतर्क व्हावे लागणार आहे.









