In view of the convenience of judicial work, there should be a bench at Kolhapur – Adv. Naik
सिंधुदुर्ग जिल्हा गोवा खंडपीठाला जोडण्याबाबत काय करता येईल यासंदर्भात विचार विनिमय करण्यात येईल असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी येथे स्पष्ट केले सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुंबई उच्च न्यायालय लांब असल्यामुळे कोल्हापूर खंडपीठ व्हावे अशी मागणी गेली कित्येक वर्षे होत आहे मात्र अद्याप पुर्णत्वास आली नाही यासंदर्भात एडवोकेट परिमल नाईक यांनी नार्वेकर यांचे लक्ष वेधले. नाईक यांनी कोल्हापूर खंडपीठ व्हावी अशी मागणी केली तसेच गोवा जवळ आहे तेथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे तेथे सिंधुदुर्ग जोडल्यास आमची हरकत नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. या संदर्भात विचारविनिमय करण्यात येईल असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर हे सांवतवाडी येथे आले असता त्यांची माजी नगरसेवक सभापती ऍङ परिमल नाईक, श्री उदय नाईक, श्री. सुधीर आडीवरेकर यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी सावंतवाडी शहराच्या विकासाच्या दुष्टीने सावंतवाडी मोती तलाव संवर्धन, मल्टी स्पेशालीटी हॉस्पीटल, शहरातील नियोजीत नळपाणी योजना, भुयारी गटार योजना, भुमीगत विजवाहीनी योजना, पर्यटन या विषयावर चर्चा केली.
तसेच गेली अनेक वर्ष कोल्हापुरj खंडपीठ हा जो ज्वलंत विषय आहे त्यावर प्रदिर्घ चर्चा केली व सिंधुदुर्गातील न्यायीक पक्षकार व वकिलांना उच्च न्यायालय खंडपीठ अभावी भेडसावणारे विविध प्रश्न उपस्थित केले त्यास मा. अध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यावर योग्य तोडगा लवकरात लवकर काढण्याचे आश्वसन दिले.
यावेळी श्री. महेश सारंग, ऍड परिमल नाईक, श्री. उदय नाईक, श्री. सुधीर आडीवरेकर, श्री. संतोष गवस, श्री. अमीत गवंडळकर, श्री. बाळा बोर्डेकर, श्री. रमेश बोंद्रे आदी उपस्थित होते.
सावंतवाडी/प्रतिनिधी-









