न्हावेली / वार्ताहर
विद्याविहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस विद्यालयात मनोविकारतज्ञ डॅा. रुपेश पाटकर यांचे व्यसनमुक्ती आणि कुमारअवस्थेत मुलांची स्थिती यावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. मुलांनी आपल्या क्षमता ओळखणे आपल्या मनावर कशाप्रकारे ठाम राहावे सोशल मिडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी आपली संगत कशी असावी कुमार अवस्थेत शारीरिक स्थिती व मानसिक स्थितीवर कशाप्रकारे नियत्रंण ठेवावे यांचे मार्गदर्शन त्याचबरोबर कुमार अवस्थेपासूनच आपण कशाप्रकारे व्यसनापासून दूर राहावे अशा विषयावर विविध उदाहरणे देऊन अतिशय आनंददायी वातावरणात मार्गदर्शन केले .
यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक सदाशिव धूपकर, जेष्ठ शिक्षक विवेकानंद सावंत, नितीन बागवे,सुषमा मांजरेकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख मोहन पालेकर यांनी केले .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









