पुणे / प्रतिनिधी :
केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा 2022 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचा निकाल पाहू शकतात. या परीशेत इशिता किशोर हिने देशात, तर ठाण्याच्या कश्मिरा संखे हिने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. इशितापाठोपाठ गरिमा लोहिया, उमा हर्थी एन आणि स्मृती मिश्रा यांनी स्थान मिळविले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट upsc.gov.in आणि upsconline.nic.in वर लॉग इन करून निकाल तपासता येईल. आयोगाने 24 एप्रिल ते 18 मे 2023 या कालावधीत 582 उमेदवारांची तिसऱ्या टप्प्यातील वैयक्तिक मुलाखत घेतली होती. इशिता किशोर देशात पहिली, तर ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात पहिली आहे. यंदाच्या यूपीएससी निकालात मराठी मुलांचा दबदबा पाहायला मिळत आहे. वसंत दाभोळकरने 76 वा, प्रतिक जराड 122 वा, जान्हवी साठे 127 वा, गौरव कायंदे-पाटील 146 वा, तर ऋषिकेश शिंदेने 183 वा, अमर राऊत 277, अभिषेक दुधाळ 278, तर श्रुतिषा पाताडे 281 वा क्रमांक मिळविला. याशिवाय स्वप्नील पवारने 287 वा, अनिकेत हिरडेने 349 वा, संकेत गरुड 370 वा, ओमकार गुंडगेने 380 वा, परमानंद दराडे 393 वा, तर मंगेश खिलारीने 396 वा क्रमांक पटकावला आहे.








