सांगली : गाय व म्हैस वर्ग पशूधनातील लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण मिळण्यासाठी अनेक उपायोजना राबविण्यात येत आहेत. बाहेर जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या ऊस तोड मजूरांसोबत असणाऱ्या जनावरांचे लसीकरण प्रमाणपत्र असणे आवश्यक असून असे लसीकरण प्रमाणपत्र संबधित पशू वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून विहित नमुन्यात प्राप्त करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या जनावरांचे लसीकरण केले नाही, अशी जनावरे सांगली जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील साखर काराखन्यांच्या आवारामध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच याबाबत सर्व साखर कारखान्यांनी खबरदारी घेण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या आहेत.
तसेच बाहेर जिल्ह्यातून या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सर्व ऊस तोड मजूरांची यादी सर्व साखर कारखान्यांनी जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त सांगली, जिल्हा परिषदेचे पशूसंवर्धन अधिकारी यांच्या कार्यालयाकडे प्राधान्यांने तात्काळ सादर करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी निर्देश दिले आहेत.
Previous Articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आणखी एक टीझर प्रदर्शित
Next Article सराईत गुंड अजय विटकर टोळीविरूद्ध मोक्का








