ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नारायण राणे यांच्याकडे शिवसेनेवर टीका करण्याचे काम होते, ते काम आता संपलेलं आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यात नारायण राणे यांचे मंत्रिपद जाणार आहे, असा दावा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
वैभव नाईक म्हणाले, ठाकरे गटातून फुटलेल्या अनेक आमदारांना परत यायचे आहे. त्यांना त्यांची खरी परिस्थिती आता कळालेली आहे. उद्धव ठाकरेंनी आदेश दिला तर ते परत येतील. दरम्यान, नारायण राणेंना माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघातून त्यांच्या मुलाला उभं करायचे आहे. मात्र, जनतेचा कौल हा उद्धव ठाकरेंसोबत आहे. त्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. खरतरं नारायण राणेंचे शिवसेनेवर टीका करण्याचे काम आता संपले असून, येत्या दोन-तीन महिन्यात त्यांचे मंत्रीपद जाईल.
अधिक वाचा : दुबई आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची होणार कोरोना चाचणी








