कोल्हापूर :
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार नवीन वर्षांत सर्व बँकामधील धनादेशाबाबत, अखंड समाशोधन सेवा (कंटीन्यूझ क्लिअरिंग सर्व्हिंसेस ) म्हणजेच ‘चेक टंकेशन सिस्टिम’ (सीटीएस) प्रणाली कार्यान्वित होणार आहे. यासाठी धनादेश देणाऱ्यांनी आता बँक खात्यावर पुरेशी रक्कम शिल्लक ठेवणे गरजेचे ठरणार आहे. ही सीटीएस प्रणाली सुरू करण्यासाठी कांही काळ लागणार असल्याचे बँक सूत्राकडून सांगण्यात येते. सद्यस्थितीत जिल्हयातील समाशोधन गृहांची सेवा बंद करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्हयात नागरी, शेडयूल्ड, राष्ट्रीयकृत खाजगी बँकांचे मोठे जाळे आहे. या प्रत्येक शाखा व बँकेमार्फत धनादेशाव्दारे कोटयवधी रूपयाची मोठी आर्थिक आदान–प्रदान होत असते. यासाठी कोल्हापूरात लक्ष्मीपुरी येथे समाशोधन गृह होते. याव्दारे (क्लिअरिंग हाऊस ) प्रत्येक बँकाचे धनादेशाची रक्कम जमा–नावे होत असे.
यानंतर हे समाशोधन गृह रेल्वे स्टेशन परिसरातील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेमध्ये सुरू करण्यात आले होते. पण जिल्हयातील समाशोधन गृह बंद झाल्याने, समाशोधन गृहामध्ये अमूलाग्र बदल करण्यात आले आहे.
जिल्हयातील या धनादेशांचे व्यवहार मुंबईं व पुणे येथील समाशोधन गृहामध्ये सुरू असून, दोन दिवसानंतर धनादेश पास केला जात आहे. यासाठी आता प्रत्येक बँकेमध्ये एक मशिन बसवण्यात आले असून, या मशिनव्दारे धनादेशाचे कॉम्पुटराईंज्ड स्कॅनिंग करून, पुणे व मुंबई येथे हे धनादेशाची रक्कम जमा केली जाते. हे धनादेश बँकेतच ठेवले जातात. धनादेशामधील खाडाखोड झाल्यास धनादेश मशिनमध्ये घेतले जात नाही. ही प्रणाली सुरू झाल्यास, चेक भरणा केल्यापासून, अवघ्या दोन तासात धनादेशचे पैसे जमा होणार आहेत. यासाठी सहा टप्प्यामध्ये ही यंत्रणा राबवली जाणार असल्याचे राष्ट्रीयकृत बँकेच्या जबाबदार सूत्राकडून सांगण्यात आले. यामुळे स्थानिक स्तरावर एकूण धनादेश व रक्कम बाबतची माहीती स्थानिक स्तरावर उपलब्ध होऊ शकत नाही.
पारंपारिक समाशोधनमध्ये धनादेश वन डे वा बँकेच्या सुट्टीमुळे पास होण्यास दोन ते तीन दिवस वेळ लागत असे. तर कांही बाहेरील धनादेश पोष्टाव्दारे येत असल्याने, याला अवधी लागत असे. यामुळे अनेक धनादेशधारक पुरेशी शिल्लक खात्यावर ठेवत नसे. यापुर्वी रिझर्व्हं बँकेच्या गर्व्हनरनी 8 ऑगष्ट 2024 रोजी चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत याची घोषणा केली होती. या घोषणेची अंमलबजावणी नवीन वर्षात होणार आहे.
यासाठी चेक ट्रंकशेन सिस्टिम (सीटीएस) प्रणाली सुरू होत आहे. धनादेश समाशोधन गृहासाठी, नॅशनल इलेक्टाॅनिक फंड ट्रान्स्फर (एनइएफटी) व रिअल टाईंम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) व्दारे धनादेशचे जलद हस्तांतरण होणार आहे. एनइएफटीचे व्यवहार वर्षंभरात सुरू असते. यामुळे कितीही पैसे हस्तांतरीत होणार आहे. आरटीजीएसव्दारे आंतरबँकाचे हस्तांतर सुट्टीत देखील चालू राहणार आहे. या नवीन प्रणालीमुळे ग्राहकांच्या आर्थिक व्यवहाराबाबत सुरक्षितता राहणार आहे.
या प्रणालीसाठी काही काळ लागणार
जिल्हयातील धनादेशांची समाशोधन पुणे व मुंबई येथील गृहामधून होत आहे. यासाठी दोन दिवस लागत असते. रिझर्व्ह बँकेच्या नवीन प्रणालीसाठी नवीन सॉफ्टवेअर मिळणार की, यामध्ये बदल असणार याबाबतचे चित्र अजून स्पष्ट झालेले नाही. पण लवकरच ही प्रणाली सुरू होणार आहे.
अक्षय स्वामी, समाशोधन विभाग, बँक ऑफ इंडिया, शाखा लक्ष्मीपुरी








