बेळगाव : मोहाली, चंदिगड येथे झालेल्या राष्ट्रीय स्केटींग स्पर्धेत येथील सेंट पॉल्स हायस्कूलचा विद्यार्थी देवेन बामणे याने स्पीड स्केटींग व क्लासिक स्केटींगमध्ये दोन कांस्यपदके मिळविली. या स्पर्धेत देवेन हा कर्नाटक संघातील पदक मिळविणारा एकमेव खेळाडू आहे.
सदर स्पर्धेत कर्नाटकसह, पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, चंदीगड, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर येथील 12 स्पर्धकांनी अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळविला होता. सर्व 12 स्पर्धकांमध्ये चुरस लागली होती. त्यामध्ये देवेन बामणेने तिसरे स्थान मिळवित कांस्य पटकावले. देवेनचे वडील विनोद बामणे व आई ज्योती बामणे यांचे प्रोत्साहन लाभले आहे. त्याला प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर आणि मंजुनाथ मंडोळकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.









