प्रतिनिधी /मडगाव
शुक्रवारी पाळण्यात आलेल्या सां ज्यांव उत्सवाच्यावेळी नावेली येथे एका युवकाला बडून मृत्यू येण्याची घटना घडली. डोंगरी -नावेली येथील आशिष रोड्रिग्स ( 19) असे मयत युवकाचे नाव आहे.
मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमाराला घडली. घटनेची खबर कळताच मडगावचे अग्नी शमन दलाचे जवान घटनास्थळी जाऊन त्यानी मृतदेह वर काढला व मडगाव पोलिसांच्या स्वाधीन केला.
विजेचा धक्का लागून …
काही वर्षापूर्वी कुडतरी येथे याच उत्सवाच्यावेळी विहिरीत उडी घेतलेलया रॅमी पेरैरा या युवकाला मृत्यू आला होता.
‘शॉवर डॅन्स’साठी विहीरीत पंप बसवलेला होता. विहिरीत उडी घेताच विजेचा धक्का लागून वरील युवकाला मृत्यू येण्याची घटना घडली होती. त्यांच्याबरोबर आणखी दोन युवकांनीही उडी घेतली होती. मात्र ते दोघे बचावले हेते. गुरुदास कदम हे त्यावेळी कुडतरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक होते.









