वेंगुर्ले – शेतकरी व्यवसायिक औद्योगिक व घरगुती ग्राहकावर कोरोना काळापासून ते आतापर्यंतच्या कालावधीत वीज बिलांबाबत मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसलेला आहे. वीज बिलांच्या तक्रारी वाढीव वीज बिले, उच्च व कमी दाबाचा विद्युत पुरवठा याबाबतच्या शंका निरसन करण्यासाठी महावितरणातर्फे जिल्हा व्यापारी महासंघ सिंधुदुर्ग व वेंगुर्ले तालुका व्यापारी संघटना यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ने वेंगुर्ले येथे आयोजित केलेला आहे.
वेंगुर्ले येथील वेंगुर्ले तालुका व्यापारी संघाच्या कार्यालयात गुरुवार दि. 16 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या वीज ग्राहक मेळाव्याच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर नोलकर, संचालक राजन गावडे, नंदन वेंगुर्लेकर, निलेश चेंदवणकर या सहित अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यांत वीज ग्राहकावर होणाऱ्या विविध स्वरूपाच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला जाणार आहे. ग्राहकाने आपली चुकीची विज बिल या मेळाव्यात घेऊन उपस्थित राहावयाचे आहे. कोरोना पासून बऱ्याच वीज ग्राहकांची चुकीची वाढीव बिले रीडिंग न घेताच काढलेली आहे. बऱ्याच ठिकाणी एवरेज बिल सुद्धा काढण्यात आलेली आहेत. त्यामुळे वीज बिले तिप्पट वा चौपट आलेली आहेत. त्यांचा उद्रेक कोरोना काळात सर्वसामान्यांसह वीज ग्राहकांना बसला आहे. बऱ्याच ठिकाणी ओव्हर हेडलाईनच्या तारा हवे तरंगत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवाला धोका आहे.
ग्राहकांना जे वीज मीटरचे रीडिंग घेणारे मीटर रिडींग घेण्यासाठी ठरल्या दिवशी वा विशिष्ट तारीखला ते येत नाहीत, उलट ते उशिरा आल्याने रीडिंग वाढलेले असते. त्यामुळे वीस मीटर ते रिडींग घेण्यास उशिरा आल्याने वाढलेल्या रीडिंगचा आर्थिक मोठा भुर्दंड वीज ग्राहकांना पडत आहे. यावर आवाज उठविण्याची हि वेळ आहे. शासनाच्या विविध खात्यांची मोठ्या रकमेची वीज बिले थकीत असताना सुद्धा त्यांचा वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवला जातो. त्यांचे कनेक्शन तोडले जात नाही. याउलट सर्वसामान्य ग्राहकाचे वीज बिल थकीत होताच कोणतीही पूर्व सूचना न देता त्याचे वीज कनेक्शन तात्काळ तोडून त्याला अंधारात ठेवले जाते. ही दुर्दैवी बाब आहे. यालाही वाचा फोडण्याची हिच संधी आहे. वीज बिल जनरेट करताना व त्याचे वितरण करताना वीज बिल भरण्याची मुदत संपल्यानंतर वीज बिले ग्राहकांना दिली जातात. त्यामुळे जी सवलत वीज बिलात असते, ती ग्राहकांना मिळू शकत नाही. या वीज बिलाचे वितरण वीज वितरण कंपनीकडूनच हेतू पुरस्कार उशीरा होत असून यास वीज मंडळाचे अधिकारी व व्यवस्थापनच जबाबदार आहे.
वीज महावितरणच्या ज्या महाराष्ट्रासाठी योजना आहेत, त्या योजनांची माहिती ग्राहकांना कुठेही दिली जात नाही. केवळ वेंगुर्ल्यातच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणच्या स्थानिक अधिकारी वर्ग ग्राहकांना त्याची माहिती देत नाहीत. असा आरोपही या पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.
बऱ्याच ठिकाणचे रोहित्र बंद आहेत. वायर (तारा) तुटलेल्या अवस्थेत आहेत. वेंगुर्ले तालुक्यात आज सुमारे 60 टक्के पेक्षा जास्त सर्विस वायर खराब आहेत. त्याची बदलण्याची जबाबदारी ही वीज मंडळाची आहे. त्याचा खर्च ग्राहकांच्या माथी मारला जातो. वास्तविक महावितरण नियमाप्रमाणे वीज मीटर जोडणी पूर्ण झाल्यानंतर इतर सर्व वायर व पोल हा खर्च वीज वितरणने केला पाहिजे. असा वीज नियामक आयोग 2003 नुसार महावितरण करणे बंधनकारक आहे. कांही फॉल्टीमीटर अनेक ग्राहकांचे असल्याने महावितरणने ते बदलले नाहीत. या प्रकारच्या अनेक ग्राहकांच्या तक्रारी वेंगुर्ले तालुका व्यापारी संघटनेकडे आलेले आहेत. बऱ्याच वेळा फॉल्टी विद्युत मीटर बदलण्यासाठी मागणी करावयास कंपनीच्या कार्यालयात गेलेल्या ग्राहकांना आमच्याकडे वीज मीटर उपलब्ध नाहीत, तुम्ही वीज मीटर बाहेरून खरेदी करून घ्या, त्याचे पैसे आपल्या बिलातून वजावट करून घेऊ अशी चुकीची माहिती वीज वितरण कार्यालयातून दिली जाते. वेंगुर्ला तालुक्यात सुमारे 2,360 एवढे मीटर फॉल्टीमीटर आहेत. अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
महावितरण तर्फे उच्च व कमी दाबाचा विद्युत पुरवठा बऱ्याच वेळा होतो. अनेक फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीन यासह मौल्यवान वस्तू जळून नुकसान होते. होल्टेज वाढ व होल्टेज कमी यामुळे वीज ग्राहकांच्या होणाऱ्या नुकसानीची आजपर्यंत वीज वितरण कंपनीने कोणालाही नुकसान भरपाई दिलेली नाही. त्यामुळे हाय व्होल्टेज यामुळे होणाऱ्या नुकसानीस सर्वस्वी वीज वितरण कंपनीच जबाबदार आहे. हाय होल्टेजमुळे वीज ग्राहकांच्या होणाऱ्या नुकसानी नुकसानीची भरपाई हे वीज वितरण कंपनीने तात्काळ पंचनामा करून संबंधित ग्राहकास तात्काळ द्यावी. अशी ही आमची मागणी आहे.
त्यामुळे वेंगुर्ले येथील साईमंगल कार्यालयात शुक्रवारी सकाळी 10 वाजता होणाऱ्या वीज ग्राहक मेळाव्यास बहुसंख्य वीज ग्राहकानी आपले चुकीची वाढीव वीजबिले, ज्यादा होल्टेजमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे याची कागदपत्रे घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुर्ले तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर यांनी केले आहे.
Trending
- schedule
- इंग्लंड महिलांचा दुसरा विजय
- दीपक, कमलजीत, राज चंद्रा यांना सांघिक सुवर्ण,
- सावंतवाडी शहरातील रस्ते आणि स्वच्छता व्यवस्थेची दूरवस्था
- न्हावेली शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन
- शिवसंस्कारच्या माध्यमातून सावंतवाडीत इतिहास अभ्यासकांचा होणार सन्मान
- भाजप प्रवेश नाकारल्यामुळेच मंत्री केसरकर धनुष्यबाणावर लढतायत
- रत्नागिरी रेल्वे स्थानकाबाहेर कामगार सेनेचे जोरदार आंदोलन