माजगाव भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी
ओटवणे प्रतिनिधी
ओरोस येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय १७ वर्षाखालील ७५ किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत माजगाव येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाच्या कु हेमांगी गजानन मेस्त्री हिने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यामुळे तिची आता विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच १७ वर्षाखालील जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत याच हायस्कूलच्या मुलींच्या संघाने जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकाविला. तर १४ वर्षाखालील सावंतवाडी तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत या हायस्कूलच्या मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.
या सर्वांना शाळेचे शिक्षक चंद्रशेखर सावंत, भाऊसाहेब चौरे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांचे माजगाव शिक्षण सहाय्यक संस्थेचे अध्यक्ष भास्कर कासार, सचिव लक्ष्मण नाईक, उपाध्यक्ष नारायण कानसे, शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.









