In the district level Lavani dance competition Ms. Nidhi Vijay Khadapkar first
माणिक चौक वेंगुर्ला येथे सोमवार दि. 20 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूल, सावंतवाडी येथे इयत्ता चौथीत शिकणारी कु. निधी विजय खडपकर हिने लहान गटात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच लहान गटात तिचा लावणी सम्राज्ञी म्हणून गौरव करण्यात आला. तिच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









