प्रतिनिधी/बेळगाव: गणेशोत्सव आणि ईद-मिलादच्या पार्श्वभूमीवर मार्केट पोलीसांच्या वतीने बेळगावात जनजागृती पदफेरी
अवघ्या काही दिवसात येऊन ठेपलेल्या श्री गणेशोत्सव आणि ईद-मिलादच्या पार्श्वभूमीवर मार्केट पोलीस स्थानकाच्या एसीपीं यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव शहरात जनजागृती पदफेरी काढण्यात आली.
बेळगाव शहरात हिंदू आणि मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने एकत्र राहत असून यंदा श्री गणेशोत्सव आणि ईद-मिलाद हे सण एकत्र आल्याने शहरात जातीय सलोखा राखून शांतीपूर्ण सण साजरा करण्यासाठी मार्केट पोलीस स्थानकाच्या एसीपीं यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती फेरी काढण्यात आली. मार्केट पोलीस स्थानक व संवेदनशील परिसरात ही पदफेरी काढून विविध गल्लीतील प्रमुखांशी संवाद साधण्यात आला आणि शांततापूर्ण दोन्ही सण साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.