सांगली : दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांनी लोकांना झेंडू फोडला. पुणे- मुंबईतसुद्धा नसतील अशा दराने झेंडू फुलांची विक्री झाली. प्रतिकिलो २८० रुपयांनी फुलांची विक्री करत येथील विक्रेत्यांनी अक्षरशः लोकांना घाम फोडला. आसपासच्या गावात हाच दर ८० रूपये प्रति किलो होता. वाळव्यात मात्र उघड लूट करण्यात आली.
परतीच्या पावसाने पिकांचे बरेच नुकसान झाले आहे. त्यात झेंडू फुलांचाही समावेश आहे. मात्र त्या टंचाईचा फायदा शेतकऱ्यांना होण्याची गरज होती. प्रत्यक्षात मात्र व्यापा-यानी या परिस्थितीचा मोठा फायदा मिळवण्यात आला. एरवी तीस चाळीस रुपये किलो दराने विकला जाणारा झेंडू आज मात्र चार पटीपेक्षा जास्त दराने विक्री करण्यात आला. लक्ष्मी पूजनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना फुलांची मोठ्या प्रमाणात गरज असते. घरोघरी लक्ष्मी पूजन केले जाते. त्यासाठी फुलांचा मोठा वापर केला जातो. बाजारात फुलांची आवक समाधान कारक होती. आज सकाळी फुलांचा दर किलोला १४० ते १६० रूपये होता. तोच दर सायंकाळी किलोला २८० रूपये इतका भडकला. या प्रकारामुळे लोक मात्र कमालीचे संताप व्यक्त करत होते. आसपासच्या गावात झेंडू फुलांचा दर ८० रूपये किलो होता. पुजनासाठी लागणाऱ्या फळांचा तुतवडाही बाजार पेठेत होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








