कोल्हापूर :
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीतील खर्चाचा तपशील उमेदवारांनी निवडणूक निरीक्षक यांच्याकडे सादर केला आहे.यामध्ये सर्वाधिक खर्च करवीर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार चंद्रदीप नरके यांनी 32 लाख 11 हजार इतका खर्च सादर केला आहे.तर सर्वात कमी चंदगड विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार शिवाजी पाटील यांचा फक्त 16 लाख 8 हजार इतका खर्च झाला आहे.
.कोल्हापूर जिल्हयातील उमेदवारांनी आपला निवडणूकीतील खर्चाचा तपशील नुकताच निवडणूक निरीक्षक यांच्याकडे सादर केला आहे. यामध्ये सर्वाधिक खर्च आमदार चंद्रदीप नरके यांनी 32 लाख 11 हजार इतका खर्च सादर केला आहे.तर सर्वात कमी चंदगड विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार शिवाजी पाटील यांचा फक्त 16 लाख 8 हजार इतका खर्च सादर केला आहे. त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी 20 लाख 10 हजार 890 इतका खर्च निवडणूक आयोगाला सादर केला आहे.
विधानसभा निवडणूकीत उमेदवारांनी सादर केलेला खर्च
हातकणंगले
डॉ. अशोक माने (जनसुराज्य) : 31 लाख 650 हजार 441
राजूबाबा आवळे (काँग्रेस) : 16 लाख 58 हजार 869
शिरोळ
राजेंद्र पाटील–यड्रावकर (शाहू आघाडी): 19 लाख 78 हजार 175
गणपतराव पाटील (काँग्रेस) : 16 लाख 58
हजार 869
कोल्हापूर दक्षिण
अमल महाडिक (भाजप): 30 लाख 47 हजार 977 ऋतुराज पाटील (काँग्रेस) : 28 लाख 92 हजार 510
कोल्हापूर उत्तर
राजेश क्षीरसागर
(शिवसेना शिंदे गट) : 31 लाख 23 हजार 306
राजेश लाटकर (अपक्ष) : 17 लाख 28 हजार 880
शाहूवाडी
विनय कोरे (जनसुराज्यशक्ती): 24 लाख 80 हजार 347
सत्यजित पाटील– सरुडकर (शिवसेना ठाकरे गट) : 10 लाख 58 हजार 346
कागल
हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी, अजित पवार गट): 29 लाख 59 हजार 154
समरजित घाटगे (राष्ट्रवादी, शरद पवार गट) : 16 लाख 66 हजार 165
राधानगरी
प्रकाश आबिटकर (शिवसेना, शिंदे गट): 27 लाख 49 हजार 310
के. पी. पाटील (शिवसेना ठाकरे गट): 21 लाख 7 हजार 708
इचलकरंजी
राहुल आवाडे (भाजप):. 27 लाख 75 हजार 203
मदन कारंडे (राष्ट्रवादी, शरद पवार गट) : 19 लाख 56 हजार 501








