प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुकातील अनेक गावांमध्ये दीड दिवशी व पाच दिवस गणपतीचे मोठय़ा उत्साहात विसर्जन करण्यात आले. गणेशभक्तांनी आरत्या, भजन करत रविवारी पाच दिवशीय गणपती बाप्पाला भक्तिपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
सत्तरी तालुक्मयात जवळपास सर्वच गावांमध्ये पाच दिवस गणपती उत्सव साजरा करण्यात येत असतो. काही अपरिहार्य कारणास्तव काही गणपती दीड दिवसांनी विसर्जन केले जातात. यंदा मात्र बहुतांश घरांत पाच दिवस गणपतीचे पूजन करण्यात आले. पारंपरिक भजन, फुगडय़ा, आरत्या सादर करत सण उत्साहात साजरा करण्यात आला.
अनेक ठिकाणी दारुकामाची आतषशबाजी करत मिरवणुका काढण्यात आल्या. रात्री उशिरा गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले.









