कराची :
पाकिस्तानात ईशनिंदेच्या आरोपात हत्या होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. मागील आठवड्यात ईशनिंदेच्या आरोपात एकाची हत्या करण्यात आली होती. आता सिंध प्रांतात एका डॉक्टरची हत्या करण्यात आली आहे. सिंध प्रांतातील उमरकोट जिल्ह्यातील
डॉक्टर शाह नवाजची हत्या करण्यात आली आहे. सोशल मीडियावर ईशनिंदेशी निगडित सामग्री शेअर केल्याचा आरोप त्याच्यावर होता. नवाजवर पोलिसांनीच गोळ्या झाडल्या आहेत. नवाजचे जमावापासून संरक्षण करण्याऐवजी पोलिसांनीच त्याचा जीव घेतल्याने वाद उभा ठाकला आहे. तर सिंध सरकारकडून याप्रकरणी कुठलेच वक्तव्य करण्यात आलेले नाही.









