शहर पोलिसांची कारवाई : साडेतीन लाखांचा मुद्देमाल केला नष्ट: एका संशयितावर गुन्हा
प्रतिनिधी/रत्नागिरी
शहरालगतच्या मिरजोळे नाखरेकरवाडी येथील जंगलमय भागात असलेली गावठी दारूची हातभट्टी शहर पोलिसांकडून धाड टाकून पेटवल़ी यावेळी पोलिसांकडून सुमारे साडेतीन लाख रूपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. यावेळी दारूची भट्टी चालवणाऱ्या संशयिताला पोलिसांकडून गुन्हा दाखल करत अटक केली.
शिवजीत सुनील पाटील (24, ऱा मिरजोळे पाटीलवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मिरजोळे येथील नदीकिनारी असलेल्या जंगलमय भागात गावठी दारूच्या हातभट्टी सर्रासपणे सुरू असल्याचे आढळून आले आह़े या ठिकाणी शहर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असते तरीही पोलिसांच्या व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईला न जुमानता येथे गावठी दारूच्या हातभट्ट्या धगधगत असतात.
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरजोळे नाखरेकरवाडी येथील जंगलमय भागात मोठ्या पमाणावर दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 च्या सुमारास शहर पोलिसांच्या पथकाने मिरजोळे नाखरेकरवाडीतील जंगलमय भागात धाड टाकण्यात आली यावेळी पोलिसांना 60 ते 70 बॅरलमध्ये भरलेले गुळ नवसागरमिश्रित कुजके रसायन, हातभट्टीसाठी लागणारे साहित्य आढळल़े तसेच येथे हातभट्टी चालवत असताना संशयित आरोपी आढळला.
पोलिसांकडून सर्व नवसागरमिश्रित ससायन नष्ट करण्यात आले आहे. तसेच सर्व 60 ते 70 प्लॉस्टिकचे बॅरल पोलिसांकडून पेटवून देण्यात आले. येथे हातभट्टीसाठी मोठ्या पमाणावर लाकडेही ठेवण्यात आली होती. हा सर्व मुद्देमाल पोलिसांकडून नष्ट करण्यात आला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार रूपेश भिसे यांनी तकार दाखल केली. तर पोलिसांनी संशयित आरोपी शिवजीत पाटील याच्याविरूद्ध महाराष्ट्र दारू अधिनियम कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल केला आहे.
मागील काही वर्षातील मिरजोळे येथे करण्यात आलेली सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईने मिरजोळे येथे अवैधरित्या हातभट्टी चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मिरजोळे पाटीलवाडी, नाखरेकरवाडी येथे वर्षानुवर्षे गावठी दारूच्या हातभट्ट्या चालवण्यात येत असतात या कारवाईने मिरजोळेतील हातभट्टीला चाप बसणार का, याकडे लक्ष लागून राहिले आहे.









